Deepak Kulkarni
एक अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि तडजोड न करणारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. सध्या ते महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
मुंढे यांनी अन्न व औषध भेसळीविरोधात तसेच अस्वच्छतेविरुद्ध मोहीम उघडली आहे.त्यांनी मुंबई,पुणे,नागपूर अशा राज्यभरातील बड्या ब्रँड्ससह अनेक हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि गोडाऊनवर धडक कारवाई करत त्यांचे परवानेच रद्द केले आहेत.
तुकाराम मुंढेंच्या या कारवायांचं सर्वसामान्यांपासून मोठमोठ्या सेलेब्रिटीपर्यंत अशा सर्वांकडून खुल्या दिलानं कौतुक आणि त्यांच्या कार्यशैलीचं समर्थनही दिले जात आहे.
याचदरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री ईशा तलवारनंही तुकाराम मुंढे यांच्या कामाला भरभरुन दाद दिली आहे. तसेच त्यांचं कौतुक करणारी एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अभिनेत्री ईशा तलवारनं तिच्या इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढेंच्या कारवायांवर पोस्ट शेअर करताना 'मी अभिनय सोडून तुकाराम भाऊंच्या टीममध्ये जाण्याचा विचार करतेय असं म्हटलं आहे.
ईशाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे तिनं कॅप्शनला 'प्रेरणादायी' असं लिहीत तुकाराम मुंढे यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल आदरयुक्त भावना व्यक्त केल्या आहेत.
एकीकडे एफडीएनं ‘विमल इलायची’च्या जाहिरातीवरुन बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर तंबाखूजन्य किंवा पान मसाला उत्पादनाचे अप्रत्यक्षपणे प्रमोशन केल्या FDA कडून ठपका ठेवण्यात आला आहे.
ईशा तलवारने 'मिर्झापूर' या गाजलेल्या वेबसीरिजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सिझनमध्ये माधुरी यादवची प्रमुख भूमिका साकारली होती.
ईशानं हिंदीसह साऊथच्या सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसेच तिनं ट्युबलाईट, कालाकांडी, रन बेबी रन, कामयाब, शर्माजी नमकीन, परछाई आणि इंडियन पोलीस फोर्स यांसारख्या हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.