पतीचे भयंकर कांड; कोण आहेत 'या' कॅबिनेट मंत्री? स्वत:च दिली पोलिसांत तक्रार...

Rajanand More

रेखा आर्या

उत्तराखंड सरकारमधील महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री रेखा आर्या यांनी आपल्या पतीविरोधातच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल.

Rekha Arya | Sarkarnama

कोण आहेत पती?

गिरीधारी लाल साहू हे रेखा आर्या यांचे पती असून उद्योजक असल्याचे सांगतात. दोघांचा २००४ मध्ये विवाह झाला होता.

Giridhari Lal Sahu | Sarkarnama

काय घडलंं?

आर्या यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करत आपली कैफियत मांडली. त्यानंतर त्यांची पोलिसांत तक्रार.

Rekha Arya | Sarkarnama

फसवणूक

पतीचे पहिले लग्न झालेले असतानाही विवाहावेळी आपण अविवाहित असल्याचे सांगत फसवणूक केल्याचा दावा आर्या यांनी केला आहे. पहिल्या पत्नीला मुलगाही आहे.

Rekha Arya | Sarkarnama

षडयंत्र

आपल्याला जीवे मारण्याचे षडयंत्र केले जात असल्याचा आरोपही केला आहे. याबाबतचे एक ऑडिओ क्लिपही त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे.

Rekha Arya | Sarkarnama

अनैतिक संबंध

पतीचे अन्य काही महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. त्याबाबत विचारणा केल्यानंतर लेखी माफीही मागितली होती. पण वागणूक बदलली नाही, असेही आर्या यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Rekha Arya | Sarkarnama

शारीरिक छळ

पतीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही कॅबिनेट मंत्र्यांनी केला आहे. आता जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Rekha Arya | Sarkarnama

गुन्हा दाखल

रेखा आर्या यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्या यांनी पोलिसांकडे काही पुरावेही दिले असून त्याआधारे चौकशी सुरू झाली आहे.

Rekha Arya | Sarkarnama

२०१४ पासून आमदार

रेखा आर्या या भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. २०१४ पासून त्या सोमेश्वर मतदारसंघाच्या आमदार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू.

Rekha Arya | Sarkarnama

NEXT : IPS अधिकाऱ्याची थेट खासदारालाच मानहानीची नोटीस; 5 कोटींचा दावा ठोकणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा.