नागपूरमध्ये वाढला क्राईम,मुख्यमंत्री फडणवीसांनी IPS विश्वास नांगरे पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी...

Deepak Kulkarni

पोलिस दलात मोठे फेरबदल

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच महायुती सरकारनं मंगळवारी(ता.२३) पुन्हा एकदा पोलिस दलात मोठे फेरबदल केले आहेत.

CM Devendra Fadnavis IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

१२ वरिष्ठ पोलिसांच्या बदल्या

यावेळी राज्याच्या गृहविभागानं १२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

CM Devendra Fadnavis IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

नागपूर पोलिस आयुक्त

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

सध्या जबाबदारी...

त्यांच्याकडे बदलीपूर्वी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी होती.

IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

कर्तव्यदक्ष अधिकारी..

विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्रातील एक अत्यंत कर्तव्यदक्ष, धाडसी आणि लोकप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.

IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

1997 च्या बॅचचे अधिकारी

ते 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे आहेत.

IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

धडाकेबाज काम

त्यांनी आतापर्यंत नाशिकचे पोलिस आयुक्त, मुंबईचे सह पोलिस आयुक्त, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांवर धडाकेबाज काम केले आहेत.

IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

फडणवीसांच्या गुडबुकमधील अधिकारी

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी अत्यंत धाडसानं आणि प्रसंगावधानानं परिस्थिती आटोक्यात आणली होती. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना 2015 मध्ये 'राष्ट्रपती पोलीस पदक' (शौर्य) देऊन सन्मानित करण्यात आले. ते फडणवीसांच्या गुडबुकमधील अधिकारी मानले जातात.

IPS-Vishwas-nangre-patil | Sarkarnama

NEXT: शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Narendra-Darade-Defeat.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...