Deepak Kulkarni
राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीची परीक्षा ऑनलाइन आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवला होता.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी,विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली होती.
या बैठकीनंतर आयोगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकानुसार,आता सीबीटी प्रणालीची अंमलबजावणी जुलै २०२७ अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
आयोगाने परीक्षा प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. 27 सप्टेंबरला प्रस्तावित असलेली गट-क संयुक्त पूर्व परीक्षा आता 25 ऑक्टोबर 2026 रोजी, तर मुख्य परीक्षा 27 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीमार्फत होणारी भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक तसेच नियोजित वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे. परंतू, विद्यार्थी आणि यंत्रणांना नवीन परीक्षा पद्धती लागू करताना पुरेसा अवधी मिळणंही तितकंच तितकंच महत्त्वाचं असल्याची भूमिकाही आयोगाला कळवली होती.
मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं न घेण्याच्या सूचना आयोगाला दिल्या होत्या. त्यामुळे हा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मानला जातो.
सीबीटी पद्धतीनं परीक्षा घेण्याचा निर्णय तातडीनं न घेता ऑगस्ट 2027 नंतर टप्प्याटप्प्यानं अंमलात आणावी, असंही स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी आयोगाला दिले होते.
ऑफलाईन परीक्षा पध्दतीला विविध विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाची भूमिका घेतल्याचं पुढं आलं होतं.
मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांनी तीव्र विरोध वाढण्याआधीच बैठक घेत यावर तोडगा काढला. यानंतर अखेर एमपीएससीनं एक पाऊल मागं घेतलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.