Deepak Kulkarni
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णयांचा धडाकाच लावला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात प्रशासकीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यक्षम महिलांना प्राधान्यक्रमानं संधी देत नवा आदर्श पायंडा पाडताना दिसून येत आहे.
मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.
सुजाता मनोज सौनिक या 1987 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) आमदारांच्या पाठिंब्यानं आणि राज्यपालांच्या उपस्थितीत 31 जानेवारी 2026 रोजी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
स्वाती साठे या महाराष्ट्र पोलीस दलातील एक अत्यंत धाडसी आणि कणखर महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्या 1995 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. साठे या पहिल्या तुरुंग महानिरीक्षक (IG) ठरल्या आहेत.
रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या 1988 च्या बॅचच्या आयपीएस (IPS) अधिकारी शुक्ला यांनी जानेवारी 2024 ते जानेवारी 2026 या काळात राज्य पोलीस दलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
मुख्य सचिव, पोलिस महासंचालक पदानंतर शोमिता बिश्वास यांची 2 ऑगस्ट 2024 रोजी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
1995 च्या तुकडीच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे या मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहणाऱ्या पहिल्या महिला सचिव ठरल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.