Deepak Kulkarni
भारतात राजकीय पक्षांची निर्मिती ही आंदोलनातून होत असते. परंतु, कॉक्रोच जनता पार्टीचा (सीजेपी) उदय हा 16 मे रोजी सोशल मीडियावर एका रात्रीत झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी 15 मे 2026 रोजी एका सुनावणीदरम्यान देशातील बेरोजगार तरुणांची तुलना "झुरळां"शी (Cockroaches) केली होती. त्यांनी काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात असं म्हटलं होतं.
या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अभिजीत दिपके यांनी 'कॉक्रोच जनता पार्टी' या चळवळीची सुरुवात केली. अधिकृतपणे निवडणूक आयोगाकडे हा राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत नसला तरी, सोशल मीडियावर या चळवळीला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय.
एकीकडे देशाच्या राजकारणात कॉक्रोच जनता पार्टीची सध्या जोरदार चर्चा सुरू असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील एक मंदिर प्रचंड चर्चेत आलं आहे.
परळी येथील झुरळे गोपीनाथ मंदिर सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे हरिहर स्वरूपाचे दर्शन घडवणारे हे मंदिर परळीच्या धार्मिक परंपरेतील महत्त्वाचे स्थान मानले जाते.
वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर झुरळे गोपीनाथांचे दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे.या दर्शनाशिवाय परळीची तीर्थयात्रा पूर्ण होत नाही, अशी परळी पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा आहे.
भगवान श्रीकृष्णाने गोपिकांना कलियुगातही आपल्यासोबत राहण्यासाठी झुरळांच्या रूपात राहण्याचा वर दिल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच या या देवस्थानला ‘झुरळे गोपीनाथ’ नाव पडल्याची श्रद्धा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात वर्षभर लहान-मोठ्या झुरळांचा वावर दिसून येतो.
या झुरळे गोपीनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात झुरळांचा कमी जास्त प्रमाणात वावर दिसून येतो. ही झुरळे भाविकांना सहसा स्पर्श करत नाहीत; मात्र ज्यांच्या अंगावर ती पडतात, त्यांना भाग्यवान समजले जाते.
देशात कॉक्रोच जनता पार्टीनं शिक्षणव्यवस्था, बेरोजगारी यांसारख्या विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरलं आहे. अशातच आता परळी वैजनाथ येथील झुरळे गोपीनाथ मंदिर हे आकर्षणाचं प्रमुख केंद्र बनले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.