Maharashtra Election: निवडणूक आयोगानं 'झेडपी' अन् पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर आणलं 'हे' महत्त्वाचं अ‍ॅप

Deepak Kulkarni

निवडणुकांचा कार्यक्रम

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांनंतर आता राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

State Election Commission Matadhikar App | Sarkarnama

मतदान मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर झेडपी अन् पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला केली जाणार आहे.

State Election Commission Matadhikar App | Sarkarnama

महत्त्वाची अपडेट

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तोंडावर महत्त्वाची अपडेट एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

State Election Commission Matadhikar App | Sarkarnama

‘मताधिकार’ मोबाईल ॲप

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदारयादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे.

State Election Commission Matadhikar App | Sarkarnama

डाऊनलोड कसं करता येणार

राज्य निवडणूक आयोगानं मतदानासाठी उपलब्ध करुन दिलेलं ‘मताधिकार’ मोबाईल ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येणार आहे.

State Election Commission Matadhikar App | Sarkarnama

दोन पर्याय

मताधिकार या ॲपमध्ये मतदाराला आपलं नाव आणि मतदान केंद्र असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.

State Election Commission Matadhikar App | Sarkarnama

मतदार ओळखपत्राचा क्रमांक

मतदाराला मताधिकार या निवडणूक आयोगाच्या अॅपमध्ये संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक टाकावा लागणार आहे.

State Election Commission Matadhikar App | Sarkarnama

संकेतस्थळ

राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळ असल्याचंही म्हटलं आहे.

State Election Commission Matadhikar App | Sarkarnama

प्रचाराची मुदत

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचा प्रचार 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता समाप्त होणार आहे.

State Election Commission Matadhikar App | Sarkarnama

NEXT: शेवटचा फोनही कामासाठीच..., अजितदादांनी मृत्यूपूर्वी ज्या कार्यकर्त्याला फोन केला ते श्रीजित पवार नेमके कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit-Pawar-Last-Call-Audio-Recording-Shrijit-Pawar.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...