फडणवीस सरकारची शेतकरी अन् भूमिहीन शेतमजुरांसाठी नवी योजना, मिळणार 2 लाख रुपये; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Aslam Shanedivan

फडणवीस सरकार

शेतीच्या कामादरम्यान अपघात झाल्यास शेतकरी कुटुंबांना फडणवीस सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Farmer Scheme | sarkarnama

गोपीनाथ मुंडे

कृषी विभागाने गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Farmer Scheme | Sarkarnama

कोणाचा समावेश

या योजनेत शेतकऱ्यांसह भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Maharashtra Farmer Scheme | Sarkarnama

वयाची मर्यादा

या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून, वयाची मर्यादा १० ते ७५ वर्षे करण्यात आली आहे.

Maharashtra Farmer Scheme | Sarkarnama

मृत्यू झाल्यास

तर अपघाती मृत्यू किंवा दोन्ही डोळे, हात किंवा पाय निकामी झाल्यास पात्र कुटुंबाला दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

Maharashtra Farmer Scheme | Sarkarnama

अवयव निकामी झाल्यास

शेतकरी किंवा भूमिहीन शेतमजुराचा एक अवयव निकामी झाल्यास त्याला एक लाख रुपये मिळतील.

Maharashtra Farmer Scheme | Sarkarnama

कोणत्या घटनांचा समावेश

सर्पदंश, विजेचा धक्का, रेल्वे अपघात, बुडणे, उंचावरून पडणे यांसह अनेक घटनांचा योजनेत समावेश आहे.

Snake Bite | Sarkarnama

प्रस्ताव सादर करावा

अपघातानंतर आवश्यक कागदपत्रांसह दोन महिन्यांत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

Maharashtra Farmer Scheme | Sarkarnama

रस्त्यावर भिकारी बनून फिरलेला भाजपचा आमदार कोण? तब्बल साडेतीन हजार कोटींची संपत्तीचा मालक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा