Aslam Shanedivan
दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानासोबत मोठी दुर्घटना टळली.
विमानातील ओमानच्या सह-वैमानिकाने विमान पाडण्याचा प्रयत्न करत मुख्य वैमानिकावरच चाकूने हल्ला केला.
विमानात १८० हून अधिक प्रवासी होते. या सर्वांचे प्राण भारतीय कॅप्टनने प्रसंगावधान दाखवत वाचवले. तसेच विमान सौदी अरेबियातील तबूक येथे उतरवले.
यानंतर आता या हिंसक संघर्षाच्या परिस्थितीत विमानाचे नियंत्रण करणाऱ्या मुख्य वैमानिक भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कॉकपिटमधील संघर्षानंतर दोन्ही पायलट जखमी झाले असून विमान उतरताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मच्छार यांना बोईंग-७३७ विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांना तब्बल 18 वर्षांचा विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
स्मित मच्छार यांनी सुमारे ११ वर्षे भारतातील स्पाइसजेटमध्ये सेवा बजावली असून पायलट-इन-कमांड आणि वरिष्ठ कमांडर म्हणून काम केलं होते.
स्मित मच्छार यांना बोईंग-७३७ विमानासह बोईंग ७३७-८००, ७३७ मॅक्स-८ आणि ७३७ मॅक्स-९ या विमानांच्या उड्डाणांचा अनुभव आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.