Aslam Shanedivan
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असो की अप्पर जिल्हाधिकारी यांची बडदास्त जबरदस्त असते. राहायला सरकारी घर फिरायला गाडी देखील मिळते
पण आता याच शासकीय गाडीमुळे गडचिरोलीतील अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे सध्या चर्चेत आहेत
गडचिरोलीतील अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना शासकीय वाहन देण्यात आलेले नाही. यावरूनच सध्या ते नाराज आहेत.
भाकरे यांनी शासकीय वाहनाची मागणी करूनही त्यांना ते मिळाले नसल्याने त्यांनी कार्यालय सायकलने गाठले आहे
याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावरून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भाकरे यांच्यासाठी वाहनाचे निर्लेखनाचा प्रस्ताव दिला असून लवकरच नवे वाहन खरेदी केले जाणार आहे
पण तोपर्यंत खासगी वाहन भाडेतत्त्वावर घेण्याचे आदेश प्रशासन आणि भाकरे यांना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.