Girija Vyas death : राजस्थान काँग्रेसचा लढवय्या चेहरा हरपला; गिरजा व्यास यांचे निधन!

Mayur Ratnaparkhe

राजस्थान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास यांचे गुरुवारी अहमदाबाद येथे निधन झाले.

 गेल्या एक महिन्यापासून त्या रुग्णालयात दाखल होत्या. गणगौर पूजेदरम्यान त्यांच्या स्कार्फला आग लागल्याने त्या गंभीर भाजल्याचे सांगितले जाते.

जवळजवळ ९० टक्के भाजल्यामुळे त्यांची प्रकृती सतत खालावत गेली आणि अखेर त्यांनी अहमदाबादमधील झायडस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे पार्थिव उदयपूरला आणले जात आहे, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

डॉ. गिराजा व्यास यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले.

याशिवाय, गिरजा व्यास अनेकवेळा लोकसभेच्या खासदारही होत्या.

केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून गिरजा व्यास यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

 शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचे कार्य नेहमीच लक्षात ठेवले जाईल.

Next : महेंद्रसिंग धोनी भारतीय सैन्यात कोणत्या पदावर तैनात आहे माहितीये?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MS Dhoni | Sarkarnama
येथे पाहा