Pradeep Pendhare
व्हिएतनामच्या हनोई येथून फ्रान्सला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या विमानाला आग लागल्याने 7 मार्च 1938 रोजी ते मध्य प्रदेशच्या दतियामध्ये कोसळले. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.
टाटा नॅशनल एअरलाइन्सच्या स्टिंसन मॉडेलचे विमान कोलंबोहून कराचीला जाताना 14 ऑगस्ट 1943 रोजी लोणावळ्यात सह्याद्री पर्वतरांगेत धडकल्याने अपघात झाला. त्यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
इंडोनेशियाहून मुंबईला येणारे विमान 12 जुलै 1949 रोजी खराब हवामानामुळे घाटकोपर आणि पवईदरम्यानच्या परिसरात कोसळले. त्यात 45 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीहून इटलीला जाणारे एलिटालिया फ्लाइट 771 दिशा भरकटल्याने 7 जुलै 1962 रोजी जुन्नरनजीक एका डोंगराला धडकले. त्यात 94 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
28 जुलै 1963 रोजी खराब हवामानामुळे यूएई एअरलाइन्सचे विमान अनियंत्रित झाल्याने धावपट्टीवरच क्रॅश झाले. त्यात 63 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
31 मे 1973 रोजी इंडियन एअरलाइन्सचे विमान पालम विमानतळावर उतरणार होते. लँडिंगवेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने दृश्यमानतेअभावी विमान उच्चदाब वीजवाहिन्यांना धडकल्याने झालेल्या अपघातात 48 प्रवाशांचा मृत्यू झाला.
1 जानेवारी 1978 रोजी मुंबईहून दुबईसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाचेच बोइंग 747 विमान तांत्रिक बिघाडामुळे अरबी समुद्रात क्रॅश झाले. त्यात 213 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
मुंबईहून बंगळूरला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान लँडिंगवेळी गोल्फ कोर्समध्ये कोसळले. या अपघातात 146 पैकी 92 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 54 जण जखमी झाले होते.
कोलकाताहून इंफाळला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान 16 ऑगस्ट 1991 रोजी थांगजिंग पर्वतरांगेस धडकले. या अपघातात 69 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
26 एप्रिल 1993 रोजी इंडियन एअरलाइन्सचे विमान छत्रपती संभाजीनगरहून (औरंगाबाद) मुंबईसाठी उड्डाण करताना धावपट्टीवर अचानक ट्रक आडवा आला. ट्रकला धडक दिल्यानंतर विमानाला आग लागल्याने जवळपास 55 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.
12 नोव्हेंबर 1996 रोजी हरियानाच्या चरखी दादरीजवळ दोन विमाने एकमेकांना धडकली. या दुर्घटनेत दोन्ही विमानांतील 349 जणांचा मृत्यू झाला. वैमानिक आणि एटीसी यांच्यातील विसंवादामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले होते.
कोरोना काळात वंदे भारत मिशनअंतर्गत दुबईहून भारतीय नागरिकांना घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान कोझिकोडे येथे धावपट्टीवर घसरले. या अपघातात 21 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 110 जण जखमी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.