Deepak Kulkarni
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. 242 प्रवाशांसह लंडनसाठी उड्डाण घेतलेलं हे विमान अचानक खाली कोसळलं अन् मोठा स्फोट झाला.
या स्फोटात विमानात दोनशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते विजय रुपाणी हेही प्रवास करत होते. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारमधील यांगोन येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मायाबेन आणि वडिलांचे नाव रमणिकलाल रूपाणी आहे.
1960 मध्ये म्यानमारमधील राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतर करून राजकोट येथे स्थायिक झाले. गुजरातमधील सौराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली.
शिक्षण घेत असतानाच भाजपच्या विद्यार्थी संघटनेपासून म्हणजेच एबीव्हीपीपासून जोडले गेले. 1971 साली त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला. भाजपची स्थापना झाल्यापासून ते पक्षाशी सक्रियपणे जोडलेले होते. 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात ते 11 महिने तुरुंगात होते.
1996 ते 1997 या कालावधीत ते राजकोटचे महापौर, 2006 ते 2012 या काळात ते राज्यसभेचे सदस्य,2013 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्डाचे चेअरमन, 2014 मध्ये आमदारकी, त्याचवर्षी आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री बनवण्यात आले.
2016 मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष झाले. 7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2017 मध्ये भाजपने गुजरातमध्ये निवडणूक जिंकली आणि विजय रूपाणी यांना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.