HD Revanna Family : राजकारणातील बलाढ्य कुटुंब जेलमध्ये; कोण आहेत हे आमदार, माजी मंत्री, माजी खासदार?

Rajanand More

रेवण्णा कुटुंब

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील एच. डी. रेवण्णा यांच्यासह कुटुंबातील चौघांना मागील महिनाभरात जेलवारी करावी लागली आहे.

HD Revanna Family | Sarkarnama

एच. डी. रेवण्णा

जेडीएसचे संस्थापक व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र तर केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांचे बंधू. सध्या ते आमदार असून माजी मंत्रीही होते. अपहरण व रेप केसमध्ये काही दिवसांपुर्वीच अटक नंतर जामीनावर सुटका.

HD Revanna | Sarkarnama

भवानी रेवण्णा

एच. डी. रेवण्णा यांच्या पत्नी असून त्यांनाही काही दिवसांपुर्वी अपहरण प्रकरणात अटक झाली होती. त्याही सध्या जामीनावर बाहेर आहे. त्या पंचायत समितीच्या माजी सदस्य आहेत.

Bhavani Revannna | Sarkarnama

प्रज्वल रेवण्णा

लोकसभा निवडणुकीदरम्यान सेस्क स्कॅंडल बाहेर आले. एका महिलेच्या तक्रारीनंतर जर्मनीला पलायन. भारतात परतताच पोलिसांकडून अटक. सध्या जेलमध्ये. हसनचे माजी खासदार व रेवण्णा यांचे पुत्र आहे.

Prajwal Revanna | Sarkarnama

पेनड्राईव्हने खळबळ

प्रज्वल यांनी केलेल्या लैंगिक छळाचे शेकडो व्हिडिओ असलेल्या पेनड्राईव्हने खळबळ उडाली. यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.

Prajwal Revanna | Sarkarnama

भाजप-जेडीएसची कोंडी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि जेडीएसची चांगलीच कोंडी झाली. काँग्रेसकडून प्रचारात या मुद्द्याचा जोरदार वापर.

PM Narendra Modi, HD Devegowda | Sarkaranma

सूरज रेवण्णा

जेडीएसच्या कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक. विधानपरिषदेचे आमदार असून प्रज्वल हा धाकटा भाऊ आहे. दोघे भाऊ सध्या जेलमध्ये.

Suraj Revanna | Sarkarnama

फार्महाऊसवर काय घडलं?

सूरजने हसनमधील फार्महाऊसवर बोलवून अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप 27 वर्षाच्या तरुणाने केला आहे. तसेच पाच कोटींची खंडणी मागितल्याचीही तक्रार.

Suraj and Prajwal Revanna | Sarkarnama

राजकारण धोक्यात

संपूर्ण रेवण्णा कुटुंब गोत्यात आल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हसन जिल्ह्यात या कुटुंबाचा चांगलाच दबदबा पण लोकसभेच्या निवडणुकीत प्रज्वल यांचा पराभव.

Prajwal and Suraj With Mother Bhavani Revanna | Sarkarnama

NEXT : वडिलांची स्वप्नपूर्ती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.