IAS Preeti Beniwal Story : रेल्वे अपघात,14 सर्जरी, संसार मोडला पण हार न मानता लढली अन् बनली 'आयएएस'!

Deepak Kulkarni

आयएएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न

प्रीती बेनिवाल यांनी आयएएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन यूपीएससीची परीक्षा दिली.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

2020 मध्ये प्रीती यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

दोन प्रयत्न असफल ठरल्यानंतर 2020 मध्ये प्रीती यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाली.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

754 वी रँक

754 वी रँक मिळवत ती आयएएस अधिकारी झाली.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

ग्रामीण बँकेत लिपिक म्हणूनही काम

प्रीतीने एम.टेकचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2013 ते 2016 या काळात बहादूरगडमधील एका ग्रामीण बँकेत लिपिक म्हणूनही काम केले.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

मूळची हरयाणा...

मूळची हरयाणामधील दुपेडी गावात प्रीतीचं बालपण गेले. शिक्षण फाफडाणा गावात एका खासगी शाळेत झाले.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

बी.टेक व एम.टेक...

इसराना कॉलेजमधून तिने बी.टेक व एम.टेक या दोन्ही विषयांमध्ये पदवी प्राप्त केली.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

वडिलांची नोकरी तर आई...

प्रीतीचे वडील हे पानिपत थर्मल प्लांटमध्ये नोकरी करत असत. तसेच तिची आई बबिता ही जवळच्या अंगणवाडीत काम करत होती.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

अपघातामुळे तिच्यावर 14 सर्जरी

गाझियाबाद रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातामुळे तिच्यावर 14 सर्जरी कराव्या लागल्या होत्या.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

Sarkarnama संसार मोडला....

एखाद्या माॅडेल, अभिनेत्रीला लाजवेल अशी सौंदर्य लाभलेल्या प्रीतीला त्यानंतर अनेक संकटांना सामोरे जावे लागले. वर्षभर अंथरुणाला खिळलेल्या तिला नवऱ्याने स्वीकारले नाही. परिणामी संसार मोडला.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

यशस्वी झेप...

प्रीतीनं या संकटावर मात करत यूपीएससीचा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कठीण परिश्रम, चिकाटी, जिद्दीच्या जोरावर तिने यशस्वी झेप घेतली.

IAS Preeti Beniwal Story | Sarkarnama

NEXT : हेमा मालिनी ते कंगना... हे सेलिब्रिटी पोहचले संसदेत!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.