IAS Tina Dabi : 'आयएएस' टीना डाबी पुन्हा चर्चेत, विद्यार्थ्यांची 'ती' टिप्पणी,प्रकरण थेट पोलिसांच्या अटकेपर्यंत पोहोचलं...

Deepak Kulkarni

उत्कृष्ट कामगिरी

आयएएस अधिकारी टीना दाबी या त्यांच्या निखळ सौंदर्यासाठी आणि प्रशासनातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखल्या जातात.

IAS Tina Dabi | SARKARNAMA

यूपीएससीच्या परीक्षेत अव्वल

यूपीएससीच्या 2015 च्या परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवून त्यांनी प्रशासकीय सेवेत एन्ट्री झाली होती.

IAS Tina Dabi | Sarkarnama

राजस्थानमध्ये जिल्हाधिकारी

आयएएस अधिकारी असलेल्या टीना डाबी या राजस्थानमध्ये जिल्हाधिकारी पदावर काम करत आहे.

IAS Tina Dabi | Sarkarnama

मोठं फॅन फॉलोईंग

सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोईंग असलेल्या टीना या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी कर्तव्य बजावताना कायमच महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासावर भर दिला आहे.

IAS Tina Dabi | Sarkarnama

मोठा वाद

टीना डाबी या राजस्थानमधील बाडमेरच्या जिल्हाधिकारी असून त्यांच्यावर 'रील स्टार' अशी टिप्पणी केल्याने मोठा वाद पेटला आहे.

IAS Tina Dabi.jpg | Sarkarnama

विद्यार्थ्यांचा आरोप...

अभाविपच्या दोन विद्यार्थी महिला कॉलेजच्या बाहेर शुल्क वाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. पण ही कारवाई पोलिसांनी शुल्क वाढीविरोधात नाही तर टीना डाबी यांना 'रील स्टार' म्हटल्यामुळे केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

tina dabi case | Sarkarnama

जिल्हा प्रशासनाचा दावा...

परंतू, याबाबत बोलताना जिल्हा प्रशासनानं विद्यार्थ्यांचे हे आरोप फेटाळून लावले असून पोलिसांनी ही कारवाई कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केल्याचा दावा केला.

Tina Dabi | Sarkarnama

'रील स्टार' असा उल्लेख

महाविद्यालयाबाहेर महिला विद्यार्थी शुल्कवाढीविरोधात आंदोलन करत असताना अभाविपचे विद्यार्थीही त्यात सहभागी झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्याविषयी 'रील स्टार' असा उल्लेख करण्यात आला.

Tina Dabi | Sarkarnama

मोठी गर्दी

पोलिसांच्या कारवाईची माहिती समजताच आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमा झाली. तसेच दोन विद्यार्थ्यांच्या अटकेवरुन कॉलेजच्या विद्यार्थिनींनी संताप व्यक्त केला.

Tina Dabi | Sarkarnama

NEXT: मैदान गाजवलं आता सीमा राखण्याची वेळ! सीमा सुरक्षा दलात खेळाडूंना सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

BSF-recruitment-2025-1.jpg | SARKARNAMA
येथे क्लिक करा...