Job Vacancy : मैदान गाजवलं आता सीमा राखण्याची वेळ! सीमा सुरक्षा दलात खेळाडूंना सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज!

Rashmi Mane

नोकरीची मोठी संधी

सीमा सुरक्षा दलामार्फत (BSF) तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Indian Army and BSF | Sarkarnama

'बीएसएफ'मध्ये

बीएसएफच्या आस्थापनेवर कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या एकूण 549 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

Indian Army and BSF

खेळाडू प्रवर्गातील उमेदवार

ही भरती विशेषतः खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांसाठी असून देशसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता दाखवण्याची संधी यातून मिळणार आहे.

Indian Army and BSF

उल्लेखनीय कामगिरी

या भरती प्रक्रियेमध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या 549 जागांचा समावेश आहे. या सर्व जागा खेळाडू कोट्यातून भरल्या जाणार असून विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Indian Army and BSF | Sarkarnama

सुवर्णसंधी

त्यामुळे राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर खेळाचा अनुभव असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच संबंधित क्रीडा प्रकारातील आवश्यक पात्रता, प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त स्पर्धांमधील सहभाग असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया

बीएसएफकडून ठरवण्यात आलेल्या क्रीडा निकषांनुसार उमेदवाराची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेत सवलत

मात्र शासनाच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू राहील.

Next : भावाने सूत्र फिरवली अन् सीए व्हायला निघालेली सिद्धी थेट नगराध्यक्षाच्या खुर्चीवर! 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा