सरकारनामा ब्युरो
1875 मध्ये 'आयएमडीची स्थापना झाल्यानंतर कोलकाता आणि सिमला (तत्कालीन उन्हाळी राजधानी) येथून दैनंदिन कार्य सुरू झाले.
1885 पासून दैनंदिन, मासिक आणि दीर्घकालीन अंदाज देण्याचे काम शिमला येथून सुरू झाले. शिमला हेच 'आयएमडी'चे अधिकृत मुख्यालय झाले.
पुढे 'आयएमडी'च्या कामाचा पसारा वाढू लागल्यानंतर संस्थेचे मुख्यालय मैदानी भागात असावे असा विचार पुढे आला.
हे मुख्यालय पुण्यात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तत्कालीन महासंचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी 1924 मध्ये सरकारकडे पाठवला.
या प्रस्तावाला मंजुरी मिळून 1928 पासून आयएमडीचे काम पुण्यातून सुरु झाले.
शिवाजीनगरला 10 एकरांत आयएमडीची वेधशाळा, कार्यालयाची इमारत आणि अधिकाऱ्यांचे निवास उभारण्यात आले.
सिमल्यावरून हे मुख्यालय पुण्यात आल्यामुळे पुणेकरांनी या वेधशाळेचे नामकरण शिमला ऑफिस असे केले.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान हवामानाची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी 'आयएमडी'चे मुख्यालय दिल्लीला हलवले. स्वातंत्र्यानंतरही ते दिल्लीतच राहिले.
'IMD'मध्ये पुण्याच्या शिमला ऑफिसला अनन्यसाधारण महत्व आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्रीय सेवांचे पुणे हे केंद्र आहे.
पुढील काही तासांपासून ते मान्सून किंवा ऋतूंचे हंगामी अंदाज विविध मॉडेलच्या साह्याने पुण्यात तयार केले जातात.
शेतकरी, प्रशासन, धरण व्यवस्थापन, ऊर्जा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांना अपेक्षित असणारे नेमके अंदाज 'IMD' कडून दिले जातात.
देशभरातून जमा होणाऱ्या हवामानाच्या नोंदींचे संकलन करून तत्काळ त्या संग्रहित करण्याची व्यवस्था आयएमडी पुणेकडे आहे.
चला काश्मीरला, दहशतवादाला हरवायचंय! मराठमोळ्या अभिनेत्यानं गाठलं पहलगाम...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.