Aslam Shanedivan
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार असून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही
तर देशभरातील सुमारे 1150 हून अधिक टोलनाक्यांवर टोल वसुली प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केली जाणार आहे
याबाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर केला असून याची अंमलबजावणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मार्फत केली जाणार आहे
टोल संकलनात पारदर्शकता वाढवणे, वाहतुकीचा वेग कायम राखणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार वाहनधारकांना टोल भरण्यासाठी फास्टॅग किंवा यूपीआय या पर्यायांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
दरम्यान आता सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद, व्यवहारासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान सध्या वैध फास्टॅगशिवाय टोल लेनमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल आकारला जातो. तर यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 1.25 पट रक्कम भरावी लागते.
पण आता 1 एप्रिलनंतर रोख व्यवहार पूर्णतः बंद होणार असून टोल हा फास्टॅग रिचार्ज किंवा यूपीआय मधूनच पेमेंट स्वीकारलं जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.