सरकारनामा ब्यूरो
पोस्ट ऑफिसने लॉच केलं आहे 'डाक सेवा 2.0' अॅप. यामुळे होणार तुमचा फायदा आता तासंतास रांगेत उभं राहायची गरज नाही, घरबसल्या मोबाइलवर होतील पोस्ट ऑफिसची सगळी कामे! जाणून घ्या वापरण्याची पद्धत…
'डाक सेवा 2.0' अॅपमुळे काम होणार आधुनिक, वेगवान आणि सोपी या अॅपमधून तुम्ही पार्सल, रजिस्टर लेटर, स्पीड पोस्ट ट्रॅक करू शकता तसेच जवळचं पोस्ट ऑफिस सुद्धा अॅपद्वारे शोधू शकता.
यासोबतच अॅपमधून व्याज कॅलक्युलेटरद्वारे सुकन्या, RD, FD, MIS, SCSS, NSC, KVP आणि MSSC यांसारख्या लघु बचत योजनांचा परतावा मोजता येणार आहे.
तुमची समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारणाचा पर्याय देखील उपलब्ध आहे, तुमच्या मोबाइलवरून अॅपमधून थेट तक्रार नोंदवा आणि तिचं स्टेटस ट्रॅक करता येणार आहे. तसेच टोल फ्री हेल्पलाईन आणि ऑनलाइन असिस्टंट चॅटचा वापर करता येणार आहे.
खर्चाचा अंदाज आधीच घेता येणार.. तुम्हाला पार्सल पाठवायचे असल्यास त्याचे वजन आणि ठिकाण टाकून किती खर्च येईल, हे तुम्हाला अॅपवरच पोस्टेज कॅलक्युलेटरद्वारे समजू शकणार आहे.
डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनांसाठी वय, कालावधी व इतर तपशील भरून संबंधित पॉलिसींचे मासिक किंवा वार्षिक प्रीमियम किती येईल हे कॅलक्युलेटर द्वारे अचूक समजू शकणार आहे.
23 भारतीय भाषांमध्ये सेवा उपलब्ध हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, उर्दू आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये हे अॅप वापरता येणार आहे.
डार्क मोड आणि स्मार्ट सर्च! डार्क मोडमध्ये अॅप वापरा आणि हवं ते थेट शोधता येणार. सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध आहेत. Digital India कडे डाक विभागाचं मोठं पाऊल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.