Pradeep Pendhare
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मोहम्मद मसूद अझहर अल्वी जानेवारीत 1994 मध्ये ढाका इथून दिल्लीला विमानाने आला होता.
दिल्लीतील एका प्रसिद्ध हॉटेल्समध्ये काही दिवस राहिल्यानंतर, मसूद प्रथम देवबंद आणि नंतर काश्मीरला पोचला.
भारताने 10 फेब्रुवारी 1994 रोजी त्याला अनंतनागजवळील खानाबल येथून अटक केली आणि दहशतवादी कारवायांसाठी तुरुंगात टाकले.
मसूद अझहरच्या अटकेनंतर 10 महिन्यांच्या आतच, अतिरेक्यांनी दिल्लीतील काही परदेशी लोकांचे अपहरण करत मसूदच्या सुटकेची मागणी केली.
दहशतवाद्यांनी सहारनपूर इथं ओलिसांना सोडवण्यात उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांना यश आल्याने ही कारवाई अयशस्वी झाली.
एका वर्षानंतर, हरकत-उल-अन्सारने पुन्हा काही परदेशी लोकांचं अपहरण करून त्यांना सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न देखील अयशस्वी झाला.
यानंतर 1999 मध्ये मसूदला जम्मूतील कोट भालवाल तुरुंगात ठेवण्यात आले. त्यावेळी त्याच्याबरोबर काश्मिरी, अफगाण आणि पाकिस्तानी अतिरेकी तुरुंगांत होते.
डिसेंबर 1999 मध्ये नेपाळमधील काठमांडूहून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईटचे दहशतवाद्यांनी अपहरण करत मसूदची सुटका करून घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.