Aslam Shanedivan
गेल्या काही दिवसापासून पुन्हा सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून धडाधड निर्णय घेतले जाताय
आताही अमेरिकेतून स्थलांतरितांची हकालपट्टी केली जात असून अमेरिकेत व्हिसावर राहणाऱ्या लोकांनाही हद्दपारीचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे
अमेरिकेत व्हिसावर राहणाऱ्या लोकांचा इमिग्रेशन स्टेटस रद्द करत अमेरिकेनं भारतासह अनेक देशांना दणका दिला आहे
या निर्णयाविरोधात अमेरिकेच्या गृह विभाग आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांना चार परदेशी विद्यार्थ्यांनी न्यायालयात खेचले असून यात एक भारतीय विद्यार्थ्यी चिन्मय देवरेही आहे.
चिन्मय देवरे हा वेन स्टेट युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण घेत असून तो 2024 कुटुंबासह एच 4 डिपेंडेंट व्हिसावर अमेरिकेत गेला होता.
येथे तो 2021 पासून संगणक शास्त्रात पदवीचे शिक्षण घेत आहे.
2008 मध्ये त्याच्या कुटुंबाने अमेरिका सोडली होती. पण 2014 मध्ये पुन्हा अमेरिकेत स्थायिक झाले होते.
इमिग्रेशन दर्जा कोणतीही सूचना किंवा माहिती न देता संपुष्टात आणण्यात आल्याचा दावा याचिकेतून चिन्मय देवरेसह त्या तीन विद्यार्थ्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.