Aslam Shanedivan
अत्यंत हलाखीची परिस्थिती असणाऱ्या कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणे यांनी आयपीएस पदाला गवसणी घातली आहे.
भारतीय पोलिस सेवेतील आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न बिरदेव डोणे यांनी सत्यात उतरवल्यानंतर त्यांचे देशभरात कौतुक झाले.
कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरदेव डोणे यांनी २०२४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करत आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला.
पण आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आई-वडिलांसोबत इतर नातेवाईकांना पहिला विमान प्रवास घडवला. सध्या याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
सध्या बिरदेव डोणे यांचे हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना अकादमीच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी नेले. त्यावेळी धनगरी पारंपरिक वेषातच हे कुटुंब हैदराबादला दाखल झाले होते.
एका आयपीएस अधिकाऱ्याचे आई-वडील आणि कुटुंब असूनही कोणताही बडेजाव, कोणताही थाटमाट न करता अगदी साध्या पेहरावात त्यांचे कुटुंब अकादमीत फिरत होते.
या प्रवासानंतर बिरदेव डोणे यांनी, ज्या क्षणापासून मी फक्त विमान पाहण्याचे स्वप्न पाहत होतो, त्या पायऱ्या एक दिवस माझे कुटुंब चढेल, हा विचारही शब्दांच्या पलीकडचा आहे. हा क्षण व्यक्त करता येण्यासारखा नाही फक्त कृतज्ञता, असे म्हटलं आहे.
Narendra Modi foreign visits 2025 : फ्रान्स ते ओमान; नरेंद्र मोदींचे 2025मध्ये गाजलेले 23 परदेश दौरे...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.