Akshay Sabale
2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला 'वंचित'मुळे मोठा फटका बसला होता.
'वंचित'च्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा सात जागांवर पराभव झाला होता. त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा 1 लाख 58 हजार 608 मतांनी पराभव झाला होता. प्रकाश आंबेडकर यांनी 1 लाख 70 हजार 7 मते घेतली होती.
स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा 96 हजार 39 मतांनी पराभव झाला होता. 'वंचित'चे अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार 419 मते पडली होती.
काँग्रेसचे विशाल पाटील यांचा 1 लाख 64 हजार 352 मतांनी पराभव झाला होता. 'वंचित'चे गोपीचंद पडळकर यांना 3 लाख 234 मते मिळाली होती.
काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा केवळ 40 हजार 148 मतांनी पराभव झाला होता. 'वंचित'चे यशपाल भिंगे यांनी 1 लाख 66 हजार 196 मते घेतली.
राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद शिगणे यांचा 1 लाख 33 हजार 287 मतांनी पराभव झाला होता. 'वंचित'चे बळीराम सिरस्कार यांनी 1 लाख 72 हजार 627 मते घेतली होती.
काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांचा 77 हजार 526 मतांनी पराभव झाला. 'वंचित'चे रमेश गजबे यांना 1 लाख 11 हजार 468 मते मिळाली होती.
R
NEXT : RBI ला सल्ला, ए-आय तंत्रज्ञान अन् पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत; मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.