Bhimrao Ambedkar : धम्मसेवा ते लोकसभा निवडणूक...! आंबेडकरांचे नातू भीमरावांची राजकीय इनिंग...

Rajanand More

लोकसभेचे उमेदवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.

Bhimrao Ambedkar | Sarkarnama

तिघे बंधू रिंगणात

भीमराव यांच्यासह त्यांचे बंधू वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकरही निवडणूक लढवत आहेत.

Sujat Ambedkar, Anandraj Ambedkar, Bhimrao Ambedkar | Sarkarnama

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यापुर्वी त्यांनी लोकसभा लढवली आहे.

Prakash Ambedkar | Sarkarnama

आनंदराज आंबेडकर

रिपब्लिकन सेनेने अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे अमरावतीतील उमेदवार आहेत. पहिल्यांदाच तिघे बंधू निवडणूक लढवत असल्याने उत्सुकता.

Anandraj Ambedkar | Sarkarnama

बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष

भीमराव हे भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असून समता सैनिक दलाचे अध्यक्ष आहेत.

Bhimrao Ambedkar | Sarkarnama

धम्मसेवा

बौध्द महासेभेच्या माध्यमातून भीमराव आंबेडकर देशभरात धम्मसेवेचे कार्य करत आहेत. बौध्द धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्न.

Bhimrao Ambedkar | Sarkarnama

खर्गेंची भेट

काही दिवसांपुर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

Mallikarjun Kharge, Bhimrao Ambedkar | Sarkarnama

ग्लोबल रिपब्लिकन पक्ष

भीमरावांनी ग्लोबल रिपब्लिकन पक्षाकडून होशियारपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना गॅस सिलिंडर हे चिन्ह मिळाले.

Bhimrao Ambedkar, Prakash Ambedkar | Sarkarnama

प्रचार जोरात

भीमराव आंबेडकरांनी स्थानिक कार्यकर्त्यांची सहकार्याने प्रचार सुरू केला आहे. त्यांना भाजप, आपसह काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांशी टक्कर द्यावी लागत आहे.

Bhimrao Ambedkar | Sarkarnama

NEXT : एकाही पक्षाला हॅटट्रिक साधता न आलेल्या 'या' मतदारसंघाची रंजक कहाणी तुम्हाला माहित आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.