Lok Sabha Election 2024 : ठाकरेंचे झाले शिंदे; मनसेची साथ सोडलेले शिलेदार शिवबंधनात!

Chetan Zadpe

ठाकरे गटात प्रवेश -

मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

मनसेला जय महाराष्ट्र -

राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर किर्तीकुमार शिंदे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता.

कसल्याही अपेक्षाशिवाय प्रवेश -

शिवसेनेत कोणतं पद मिळेल, याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे शिंदे म्हणाले.

कट्टर भाजप विरोधक-

किर्तीकुमार हे कट्टर भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीचे विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे.

मराठीला लाभ नाही -

राज ठाकरे यांनी मोदींची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही, असे म्हणत त्यांनी मनसेची साथ सोडली.

गुढीपाडव्या मेळाव्यानंतर राजीनामा -

राज ठाकरेंची गुढीपाडवा मेळ्याव्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी राजीनामा दिली होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे, अशी पोस्ट त्यांची चर्चेत आली होती.

ठाकरे गटाची खिंड -

आज ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आता ते ठाकरेंसाठी आता खिंड लढवताना दिसतील.

NEXT : राहुल गांधी सतत पांढरा टी-शर्ट का घालतात? कारण आलं समोर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.