Who Is hardhavardhan Jadhav : लोकसभेच्या मैदानात पुन्हा उतरलेल्या हर्षवर्धन जाधवांचा राजकीय प्रवास कसा?

Akshay Sabale

लोकसभेच्या मैदानात -

माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

hardhavardhan Jadhav | sarkarnama

जाधवांमुळे खैरे पराभूत -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधवांमुळे चार टर्म विजयी झालेल्या चंद्रकांत खैरे यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली होती. त्या जाधवांबद्दल जाणून घेणार आहोत...

hardhavardhan Jadhav | sarkarnama

पिशोर हे मूळ गाव -

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर हे हर्षवर्धन जाधवांचं मूळ गाव. त्यांचे वडील रायभान जाधव हे माजी आमदार होते.

hardhavardhan Jadhav | sarkarnama

जिल्हा परिषदमध्ये विजयी -

1999 मध्ये पिशोर जिल्हा परिषद सर्कलमधून हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली. कन्नड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही जाधव निवडून आले होते.

hardhavardhan Jadhav | sarkarnama

कन्नडचे आमदार -

2009 मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते कन्नडचे आमदार म्हणून निवडून आले.

hardhavardhan Jadhav | sarkarnama

मनसेतून बाहेर -

तेव्हापासून दहा वर्षं म्हणजे 2009 ते 2019 पर्यंत जाधव कन्नकडे आमदार राहिले. पण, 2019 मध्ये जाधव मनसेतून बाहेर पडले आणि शिवसेनेत प्रवेश केला.

hardhavardhan Jadhav | sarkarnama

दोन लाख मते मिळाली -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत जाधवांनी 'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' स्थापन केला आणि दोन लाखांपेक्षा अधिक मतं मिळवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण त्यांच्यामुळे खैरेंनाही पराभवाला सामोर जावं लागलं.

hardhavardhan Jadhav | sarkarnama

पुन्हा मनसेत प्रवेश -

नंतर 'शिवस्वराज्य बहुजन पक्षा'कडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. पण यात शिवसेनेच्या उदयसिंह राजपूत यांनी त्यांचा पराभव केला. पुन्हा जाधवांनी मनसेत प्रवेश केला होता.

hardhavardhan Jadhav | sarkarnama

वंचितकडून लढण्याची इच्छा व्यक्त -

काही महिन्यांपूर्वी जाधवांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता. आता पुन्हा जाधव लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांनी वंचितकडून लढण्याची इच्छा व्यक्त केलीय.

hardhavardhan Jadhav | sarkarnama

NEXT : कंगना, शत्रुघ्न सिन्हांसह 'हे' दिग्गज कलाकार लोकसभेच्या रिंगणात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा...