Akshay Sabale
पिलिभित येथील विद्यमान खासदार वरुण गांधी यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी जितीन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जितीन प्रसाद हे कधी काळी काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांचे सहकारी राहिले आहेत.
जितीन प्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, सचिन पायलट हे राहुल गांधींचे खास सहकारी होते. आता फक्त सचिन पायलट काँग्रेसमध्ये राहिले आहेत.
जितीन प्रसाद आणि ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपत आहेत, तर मिलिंद देवरा यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
भाजप आमदार असलेले जितीन प्रसाद सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. यापूर्वी काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी केंद्रीय मंत्रिपदावर काम केलं आहे.
2004 मध्ये काँग्रेसकडून खासदार बनल्यानंतर 2008 मध्ये जितीन प्रसाद यांना संयुक्त पुरोगामी आघाडीच्या ( यूपीए ) पहिल्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री बनवण्यात आलं होतं.
नंतर 2009 ते 2014 दरम्यान जितीन प्रसाद यांनी वेगवेगळ्या खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे.
यापूर्वी जितीन प्रसाद शाहजहांपूर आणि धौरहरा या दोन मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. याजवळील जिल्ह्यांत प्रसाद यांचा प्रभाव मानला जातोय.
त्यामुळे यंदा शाहजहांपूरजवळ असलेल्या पिलिभित लोकसभा मतदारसंघातून प्रसाद यांना तिकीट दिल्याचं बोललं जात आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.