Sadhana Saxena : साधना सक्सेना सांभाळणार लष्कराची वैद्यकीय सेवा; पहिल्या महिला महासंचालक, पुण्याशी खास नाते...

Rajanand More

साधना सक्सेना

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांनी 01 ऑगस्ट रोजी महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पदाचा पदभार स्वीकारला.

Sadhana Saxena | Sarkarnama

पहिल्या महिला अधिकारी

महासंचालक या प्रतिष्ठित पदावर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला. याआधी, एअर मार्शल पदावर पदोन्नतीवर डीजी हॉस्पिटल सर्व्हिसेस पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला.

Sadhana Saxena | Sarkarnama

पुण्याशी खास नाते

लेफ्टनंट जनरल नायर यांनी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथून प्रतिष्ठित शैक्षणिक रेकॉर्डसह पदवी प्राप्त केली.

Sadhana Saxena | Sarkarnama

1985 मध्ये सेवेत

डिसेंबर 1985 मध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर विविध पदांवर महत्वाची जबाबदारी सांभाळली.

Sadhana Saxena | Sarkarnama

महत्वाचे प्रशिक्षण

फॅमिली मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी, माता आणि बाल आरोग्य आणि आरोग्य सेवा व्यवस्थापन, डिप्लोमा, आणि AIIMS येथे वैद्यकीय माहिती शास्त्रात दोन वर्षांचे प्रशिक्षण.

Sadhana Saxena | Sarkarnama

हवाई दलात मोठी जबाबदारी

भारतीय वायुसेना (IAF) च्या वेस्टर्न एअर कमांड आणि ट्रेनिंग कमांडच्या त्या पहिल्या महिला प्रधान वैद्यकीय अधिकारी देखील आहेत.

Sadhana Saxena with her Husband | Sarkarnama

NEP मध्ये सहभाग

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वैद्यकीय शिक्षण घटकाचा मसुदा तयार करण्यासाठी लेफ्टनंट जनरल नायर यांनी डॉ. कस्तुरीरंगन समितीचे तज्ञ सदस्य म्हणून काम केले.

Sadhana Saxena | Sarkarnama

अनेक सन्मान

उत्कृष्ट सेवेसाठी एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न एअर कमांड आणि चीफ ऑफ द एअर स्टाफ कमंडेशन्स तसेच राष्ट्रपतींकडून विशिष्ट सेवा पदक असे सन्मान मिळाले आहेत.

Sadhana Saxena | Sarkarnama

NEXT : कर्तव्यदक्ष IAS घडवणारी संस्था LBSNAA

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा.