छत्रपती संभाजीराजेंच्या अतुलनीय शौर्य, बलिदानाचं प्रतीक असलेल्या 'धर्मवीर' गडाचा राज्य सरकारकडून मोठा सन्मान

Deepak Kulkarni

ऐतिहासिक धर्मवीर गड

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव येथे भीमा नदीच्या काठावर ऐतिहासिक धर्मवीर गड आजही धीरोदात्त पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmaveer Gad | Sarkarnama

बलिदानाच्या स्मृतींशी जोड...

छत्रपती संभाजी महाराजांच्या अमानुष छळ आणि बलिदानाच्या स्मृतींशी जोडलेला असल्यामुळे धर्मवीर गडाचं साडेतीनशे वर्षांनंतरही ऐतिहासिक वारसा म्हणून एक वेगळं स्थान आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmaveer Gad | Sarkarnama

अमानुष अत्याचार

संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर औरंगजेबानं त्यांना याच गडावर आणले होते आणि तिथेच त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले.

Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmaveer Gad | Sarkarnama

नामांतर

महाराष्ट्र सरकारने 25 मे 2008 रोजी या बहादूरगडाचं अधिकृतपणे 'धर्मवीर गड' असं नामांतर करण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली.

Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmaveer Gad | Sarkarnama

पुन्हा मोठा सन्मान

राज्य सरकारकडून आता याच धर्मवीर गडाचा पुन्हा एकदा मोठा सन्मान करण्यात आला आहे. सांस्कृतिक विभागानं या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmaveer Gad | Sarkarnama

अधिकृत जीआर

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागानं सोमवारी(ता.7 सप्टेंबर) शासन निर्णय (GR) जारी केला आहे. 'राज्य संरक्षित स्मारक' म्हणून घोषित केल्यामुळे आता धर्मवीर गडाच्या जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmaveer Gad | Sarkarnama

विशेष निधीही मंजूर

महायुती सरकारने धर्मवीर गडावरील छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आणि विकासासाठी विशेष निधीही मंजूर केला आहे. हा गड म्हणजे संभाजीराजेंचे अतुलनीय शौर्य आणि बलिदान स्वराज्य, स्वाभिमान व धर्मरक्षणाचा अजरामर इतिहास आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmaveer Gad | Sarkarnama

उत्कृष्ट स्थापत्यकलेचं उदाहरण

पेडगाव येथील धर्मवीर गडावर यादवकालीन उत्कृष्ट स्थापत्यकलेचं उदाहरण असलेलं रामेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बाळेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर अशी प्राचीन मंदिरं आजही अस्तित्व टिकून आहेत.

Chhatrapati Sambhaji Maharaj Dharmaveer Gad | Sarkarnama

NEXT: 'तारण अन् गॅरंटीची गरज नाही, व्यवसायासाठी लोनची हमी; पाच लाखापर्यंत खेळते भाडंवल देणारी 'किशोर मुद्रा लोन' योजना!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kishor-Mudra-Loan.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...