Deepak Kulkarni
आपण सगळे वीज वापरतो. शहरात राहणाऱ्या लोकांना तर लाईटशिवाय राहणं अशक्य होतं.
महावितरणकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विजेचं जाळं पाहोचवण्यात आलं आहे. विजेवरच अनेक उद्योगधंदेही अवलंबून असतात.
जसं आपण लाईट वापरतो तसेच आपल्याला लाईटबिलही भरणं गरजेचं असतं. नाहीतर महावितरणकडून जादा आकारणी किंवा लाईट कटही केली जाण्याचा धोका असतो.
पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे, ज्या गावात एकही गावकरी लाईटबिल (वीजबिल) भरत नाही.
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात असलेल्या शेळकेवाडी या लहानशा गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘पिंक व्हिलेज’ म्हणून नावारूपाला आलेले हे गाव आता 100 टक्के सौरऊर्जा आणि बायोगॅसवर चालणारे गाव बनले आहे.
हे गाव अवघ्या 100 घरांचे असून लोकसंख्या जेमतेम हजाराच्या आसपास आहे. या गावात स्वच्छता, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव होता. पण 2004 पासून गावकऱ्यांनी मोठं परिवर्तन घडवलं.
शेळकेवाडीत पंतप्रधान सूर्य घरयोजनेतंर्गत प्रत्येक घरात सोलर सिस्टीम बसवण्यात आली. सोलर सिस्टीम बसवण्यासाठी 67 हजार रुपये खर्च आला. या योजनेतून प्रत्येक घराला 30 हजार रुपये अनुदानही देण्यात आलं.
येथे राहणाऱ्या गावकऱ्यांना झिरो रुपये वीज बिल येतं. विशेष म्हणजे प्रत्येक घरातून 2 ते 3 युनिट वीज महावितरणला विकली जात आहे. गावातील नदीवर सोलर पॅनल्स बसवूनही ही वीज निर्मिती ग्रामस्थांकडून करण्यात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.