Roshan More
11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेल्या ज्योतिराव फुले यांनी सामाजिक विषमता, जातिभेद आणि अंधश्रद्धेविरोधात लढा दिला. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले.
1848 मध्ये पुण्यात भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. पत्नी सावित्रीबाई फुले यांनी या शाळेत शिक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळली.
शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळावा, यासाठी फुले यांनी शाळा सुरू केल्या. महार, मांग आणि इतर लोकांस विद्या शिकविणारी मंडळी"द्वारे वंचित समाजातील मुलांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातिभेद, सामाजिक विषमता आणि कर्मकांडांना विरोध करून सत्य, समता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला.
1873 मध्ये प्रकाशित झालेल्या 'गुलामगिरी' या पुस्तकातून त्यांनी जातिव्यवस्थेतील शोषण आणि सामाजिक विषमतेवर कठोर टीका केली. समतेचा विचार मांडणारे हे त्यांचे महत्त्वाचे लेखन ठरले.
'शेतकऱ्याचा असूड' या लेखनातून त्यांनी शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती, आर्थिक शोषण आणि प्रशासनातील त्रुटींवर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी सामाजिक सुधारणांच्या केंद्रस्थानी आणले.
विधवांची होणारी कुचंबणा आणि बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. विधवांना सुरक्षित प्रसूती आणि त्यांच्या मुलांना संरक्षण मिळावे, हा त्यामागील उद्देश होता.
11 मे 1888 रोजी ज्योतिराव फुले यांना मुंबई येथे महात्मा ही पदवी देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.