Deepak Kulkarni
भाजपनं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला. यावेळी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडण्यात आलं
एकीकडे सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला राडा आणि पराभव यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना चवताळून उठलेली असतानाच दुसरीकडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे नेमक्या कोणाचे अशी चर्चा रंगली आहे.
सातारा झेडपीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रिया शिंदे विजयी झाल्या आहेत. त्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंच्या भूमिकेवरच सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
आमदार महेश शिंदे हे शिवसेनेच्या तिकिटावर कोरेगाव मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी झेडपीच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर सदस्य झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळही पडली आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांनी ‘व्हीप मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडात त्यांना साथ दिलेल्या महेश शिंदे यांची शिवसेनेच्या तिकीटावरील आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्दीची सुरूवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली होती.
महेश शिंदेंनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. पहिल्याच लढतीत त्यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा निसटता पराभव केला. यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही विजय खेचून आणला.
आमदार महेश शिंदे हे सातारा झेडपीच्या निवडणुकीत स्वतः मैदानात उतरले, पत्नीला भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्यासाठी पडद्यामागून पूर्ण हालचाली सुरू ठेवत ताकद पणाला लावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.