Hindu terrorism : गुजरातमध्येच जन्माला आला 'भगवा दहशतवाद' शब्द : काँग्रेसने नाही तर 'या' व्यक्तीने पहिल्यांदा वापरला होता!

सरकारनामा ब्यूरो

हिंदू दहशतवाद :

हिंदू दहशतवाद यालाच भगवा दहशतवाद असेही म्हणतात. हिंदू राष्ट्रवाद किंवा हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन केलेल्या दहशतवादी कृत्यांतून हा शब्द तयार झाला.

Hindutva | Sarkarnama

गुजरात दंगल :

2002 मधील गुजरात दंगलीनंतर 'भगवा दहशतवाद' हा शब्द ज्येष्ठ पत्रकार प्रवीण स्वामी यांनी वापरला. तेव्हा ही संकल्पना प्रचंड वादग्रस्त ठरली होती.

Gujarat riots 2002 | Sarkarnama

मुस्लीम समाज :

2007-2008 मध्ये पाकिस्तान आणि भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्यात येऊ लागल्यानंतर ही व्याख्या प्रकर्षाने चर्चेत आली.

Muslims | Sarkarnama

बॉम्बस्फोट :

2007 मधील समझोता एक्सप्रेस, अजमेर बॉम्बस्फोट आणि 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा शब्द प्रचंड प्रमाणात चर्चेत आला.

Malegaon Bomb Blast | Sarkarnama

काँग्रेस :

समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटात संशयाची सुई कट्टर हिंदूत्ववाद्यांवर गेल्याने काँग्रेस नेत्यांनी हिंदू दहशतवाद शब्दावर जोर दिल्याचा आरोप केला जातो.

Congress | Sarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) किंवा अभिनव भारत सारख्या हिंदू राष्ट्रवादी संघटनांचे सदस्य हिंदू दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे आरोप झाले.

RSS | Sarkarnama

पी. चिदंबरम :

त्यानंतर तत्कालिन केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरल्याचा दावा केला जातो.

p Chidambaram | Sarkarnama

दिग्विजय सिंह :

मात्र दिग्विजय सिंह यांनी आपण हा शब्द कधी वापरलाच नसल्याचे 2019 मध्ये 'द हिंदू' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

Digvijay Singh | Sarkarnama

सुशीलकुमार शिंदे :

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही हा शब्द वापरला. त्यावरून बराच वाद झाल्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती.

Sushilkumar Shinde | Sarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ :

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र हिंदू दहशतवाद अशी संकल्पनाच खोडून काढली आहे. अशी कोणतेही गोष्ट नसल्याचे ठामपणे सांगितले.

RSS karyalaya keshav kunj | Sarkarnama

पी. चिदंबरम :

नुकतेच संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, पी. चिदंबरम यांना प्रत्युत्तर देताना अमित शहा यांनीही हिंदू दहशतवाद अस्तित्वातच नसल्याचे म्हंटले.

P. Chidambaram | Sarkarnama

अमित शहा :

मी देशातील जनतेसमोर अभिमानाने सांगू शकतो की कोणताही हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही, असे शहा यांनी म्हंटले.

Amit Shah | sarkarnama

PETA INDIA : अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला रडवणारी 'पेटा' संस्था काय आहे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

<strong>येथे क्लिक करा</strong>