Manoharlal Khattar News : मुख्यमंत्री खट्टरांना भाजपने का हटवले? काय आहे इनसाईड स्टोरी?

Chetan Zadpe

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा -

हरियाणा राज्यात आज मंगळवारी मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय घडामोड पाहायला मिळाली.

Manoharlal Khattar News

अँटी इन्कम्बन्सी -

दरम्यानच्या काळात शेतकरी आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांमुळे खट्टर सरकारच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी निर्माण होऊ लागली. खट्टर नऊ वर्षांहून अधिक काळ हरियाणाचे मुख्यमंत्री होते.

Manoharlal Khattar News | Sarkarnama

चेहरा बदलाची रणनीती -

भाजप नेतृत्वाने काही महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताविरोधी रोष कमी करण्यासाठी खट्टर यांच्या जागी नवीन चेहरा आणण्याचा विचार केला आहे.

Manoharlal Khattar News | Sarkarnama

राजकीय घडामोडी -

जाट आंदोलन, शेतकरी आंदोलन, राम रहीमच्या अटकेदरम्यान झालेला हिंसाचार यासह अनेक मुद्द्यांमुळे गेल्या काही वर्षांत हरियाणा चर्चेत आहे, त्यामुळे खट्टर यांच्या प्रतिमेवरही परिणाम झाला.

Manoharlal Khattar News | Sarkarnama

मित्रपक्षाशी बिघडले संबंध -

2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत कोणालाही बहुमत न मिळाल्यामुळे दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने (JJP) राज्यात भाजपला पाठिंबा दिला. मात्र भाजप आणि जेजेपी यांच्यातील संबंध काही काळापासून चांगले नव्हते.

Manoharlal Khattar News | Sarkarnama

दोन जागांवरुन घमासान -

लोकसभा निवडणुकीसाठी दोन जागांची जेजेपीची मागणी हे त्यामागचे एक कारण होते. दुष्यंत चौटाला यांनी सोमवारी दिल्लीत भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांचीही भेट घेतली.

Manoharlal Khattar News | Sarkarnama

जागावाटपावरुन युती तुटली -

भाजपचा असा युक्तिवाद आहे की त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणातील सर्व दहा जागा जिंकल्या. अशा परिस्थितीत जेजेपीला दोन जागा कशा देता येतील? अशी भाजपची भूमिका होती.

Manoharlal Khattar News | Sarkarnama

NEXT : परभणीतून फुंकले लोकसभेचे रणशिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा...