विरोधक सावरण्याआधीच स्टॅलिन यांनी विजय केला पक्का? एकच 'पंजा' अन् गेम फिरला...

Rajanand More

एम. के. स्टॅलिन

तमिळनाडूचे मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी विधानसभा निवडणुकीआधी मोठा डाव टाकला आहे. राज्यातील लाडक्या बहिणांना त्यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे.

M K Stalin | sarkarnama

खात्यात ५ हजार

तमिलनाडू सरकारने एकाचवेळी तब्बल १.३१ कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा केले आहेत. त्यावरून आता राजकीय घमासान सुरू झाले आहे.

Tamilnadu scheme | Sarkarnama

नेमकं कारण काय?

सरकारची महिलांसाठी कलैगनार मगलीर उरीमाई थित्तम Kalaignar Magalir Urimai Thittam ही योजना असून त्याअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला त्यांचा अधिकार म्हणून एक हजार रुपये दिले जातात.

Tamilnadu scheme | Sarkarnama

मोठा निर्णय

सरकारने फेब्रुवारी महिन्यात एकाचवेळी तीन महिन्यांचे तीन हजार रुपये आणि उन्हाळ्यासाठी अधिक प्रोत्साहन म्हणून दोन हजार रुपये असे एकूण पाच हजार जमा केले आहेत.

M K Stalin | sarkarnama

राजकीय डाव

तमिळनाडूमध्ये मे महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधीच स्टॅलिन यांनी महिलांच्या खात्यात पैसे जमा करत मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा आहे.

Election | Sarkarnama

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्यास सुरूवात केली. हे पैसे दर महिन्याला दिले जातात. पण स्टॅलिन यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाचवेळी पाच हजार दिले.

maharashtra assembly.jpg | sarkarnama

विजय पक्का?

महाराष्ट्रासह बिहारमध्ये निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे पाठविण्यात आले होते. त्यानंतर महिलांचा मतदानाचा टक्का वाढण्याबरोबरच त्यांची मते सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात पडली. स्टॅलिन यांचीही तीच रणनीती.

M K Stalin | sarkarnama

विरोधकांची टीका

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकसह भाजपने स्टॅलिन यांच्यावर यावरून टीका केली आहे. राज्यात महिलांवर अत्याचार होत असताना सरकार पैसे देण्याचे ढोंग करत आहे. हा केवळ निवडणुकीसाठी स्टंट असल्याची टीका. 

M K Stalin | sarkarnama

NEXT : हुकूमशहा किम जोंग उन यांचा उत्तराधिकारी कोण? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा.