Sunil Tingre : पुणे कार अपघात प्रकरणात चर्चेत आलेले आमदार सुनील टिंगरे!

Mayur Ratnaparkhe

पुण्यातील कल्याणीनगरमधील भीषण कार अपघात प्रकरणानंतर आमदार सुनील टिंगरे हे चर्चेत आले आहेत.

आमदार सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत.

अपघात घडल्यानंतर आमदार सुनील टिंगरे हे पोलीस ठाण्यात पोहचले होते.

अपघातच्या घटनेनंतर आमदार टिंगरेंनी मंगळवारी मीडियासमोर येत भूमिका मांडली.

मी पब आणि बारच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतली याबाबत वारंवार पोलीस आयुक्तांना निवेदनही दिली असल्याचे त्यांनी म्हटले.

शिवाय याबाबत विधिमंडळातही प्रश्न उपस्थित केले असल्याचे टिंगेर म्हणाले आहेत.

आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांच्यासोबत टिंगरे यांचे व्यावसायिक संबंध आहेत असं बोललं जात आहे.

मात्र राजकारणात येण्यापूर्वी मी त्यांच्याकडे नोकरी करायचो एवढाच माझा त्यांच्याशी संबंध आहे, असं टिंगरेंनी सांगितलं आहे.

NEXT : मुख्यमंत्री ते संजय राऊत पुण्यातील अपघात प्रकरणावर कोण काय बोललं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

eknath shinde sanjay raut | sarkarnama