Modi Government Scheme : मोदी सरकारच्या 'या' दहा योजना बनल्या निराधारांचा आधार; पाहा यादी !

Chetan Zadpe

पंतप्रधान विश्वकर्मा योजना -

कारागीरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली. कारागिरांच्या क्षमता वाढवण्याचा योजनेचा उद्देश. सुतार, सुतार, शिल्पकार, कुंभार यांना या योजनेचा लाभ. 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध. यावरील व्याजदरही ५% पेक्षा कमी. दुसऱ्या टप्प्यात कारागीरांना दोन लाख रुपयांचे कर्ज मिळणार.

Modi Government Scheme : | Sarkarnama

प्रधानमंत्री आवास योजना

गरीब आणि बेघर लोकांना पक्की घरे देण्याचा संकल्प. पंतप्रधान आवास ग्रामीण योजना गावांसाठी आणि पंतप्रधान आवास शहरी योजना शहरी भागांसाठी आहे.

Modi Government Scheme : | Sarkarnama

पंतप्रधान जन धन योजना -

या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोक '0 बॅलन्स' खाते उघडू शकतात. यामुळे गरिब जनता बँकेपर्यंत पोहचली आहे.

Modi Government Scheme : | Sarkarnama

पीएम किसान सन्मान योजना -

देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. मोदी सरकार वर्षभरात 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

Modi Government Scheme : | Sarkarnama

सुकन्या समृद्धी योजना -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2015 मध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. आर्थिक कारणांमुळे जे कुटुंब आपल्या मुलांना विशेषत: मुलींना शिक्षण देऊ शकत नाही, त्यांची चिंता दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली.

Modi Government Scheme : | Sarkarnama

पीएम उज्ज्वला योजना -

देशातील महिलांचे जीवनमाम बदलण्यासाठी 2016 मध्ये ही योजना आणण्यात आली होती. या योजनेअंतर्गत बीपीएल कार्डधारकांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते.

Modi Government Scheme : | Sarkarnama

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना

कोरोना महामारीच्या काळात देशातील 80 कोटींहून अधिक कुटुंबांना मोफत अन्न पुरविण्यात आले. केंद्र सरकारने या योजनेला अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. या योजनेंतर्गत दरमहा ५ किलो गहू किंवा तांदूळ दिला जातो.

Modi Government Scheme : | Sarkarnama

आयुष्मान भारत योजना

देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन मोदी सरकारने आयुष्मान योजना सुरू केली आहे. आयुष्मान कार्डधारकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळतात. औषधे व उपचार इत्यादींचा खर्च सरकार उचलते.

Modi Government Scheme : | Sarkarnama

पीएम महिला किसान ड्रोन केंद्र -

पंतप्रधानांनी महिलांसाठी महिला किसान ड्रोन केंद्र सुरू केले आहे. महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून त्यांना या तंत्रज्ञानाचा उपजीविकेसाठी वापर करता येईल.

Modi Government Scheme : | Sarkarnama

पीएम कौशल्य विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उद्देश तरुणांमध्ये कौशल्य निर्माण करणे हा आहे. 1 कोटी 10 लाखांहून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ही योजना बेरोजगारांसाठी खूप उपयुक्त ठरली आहे.

Modi Government Scheme : | Sarkarnama

NEXT : पाकिस्तानच्या निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू मुलगी; कोण आहे सवेरा प्रकाश?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा..