Municipal Election : प्रभागरचनेनुसार चार मतदान कसे कराल? घ्या समजून..

Ganesh Sonawane

चार उमेदवारांचं पॅनल

महानगरपालिकेची निवडणूक ही प्रभाग रचनेनुसार होणार असून एका प्रभागात चार उमेदवारांचं पॅनल असणार आहे. अशावेळी चार उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावं लागणार आहे.

Municipal Election 2026 | Sarkarnama

स्टेप बाय स्टेप

पालिका निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया.

Municipal Election 2026 | Sarkarnama

दोन किंवा चार ईव्हीएम

यावेळी मतदान केंद्रावर कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतील. तुम्हाला मतदान एकूण चार म्हणजेच जागा अ, ब, क, ड अशा चार जागांसाठी मतदान करणं आवश्यकच आहे.

Municipal Election 2026 | Sarkarnama

संख्येनुसार जागांची आखणी

उमेदवारांच्या संख्येनुसार या चारही जागांची आखणी ईव्हीएम मशीनवर करण्यात येणार आहे. यासाठी एकतर चार स्वतंत्र ईव्हीएम असतील, किंवा दोन मशीनवर या जागा विभागण्यात येईल.

Municipal Election 2026 | Sarkarnama

मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे

चारही जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे दिलेले जाणार आहे. अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी गुलाबी रंग, क जागेसाठी पिवळा रंग व ड जागेसाठी निळा रंग असणार आहे.

Municipal Election 2026 | Sarkarnama

नाव व चिन्ह

प्रत्येक मशीनवर उमेदवाराचे नाव व त्याचे निवडणूक चिन्ह असेल. 'अ' जागे समोरील बटन दाबताच लाल रंगाचा लाईट लागेल. याचा अर्थ त्या जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हीच पद्धत ब, क आणि ड जागेसाठीही असेल.

Municipal Election 2026 | Sarkarnama

NOTA

जर तुम्हाला चारपैकी कोणताही उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर तुमच्यासाठी NOTA पर्याय देखील देण्यात येणार आहे.

Municipal Election 2026 | Sarkarnama

बजर वाजेल

शेवटचं म्हणजे, ड जागेसाठी मतदान केल्यावर बजर वाजेल. याचा अर्थ तुम्ही चारही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण केली आहे.

Municipal Election 2026 | Sarkarnama

NEXT : शब्द ठाकरेंचा, मुंबईसाठी खास जाहीरनामा; कुठली आश्वासनं दिली?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Thackeray Manifesto | sarkarnama
येथे क्लिक करा