Rashmi Mane
आजच्या काळात फक्त कमाई पुरेशी नाही, तर योग्य नियोजन आणि सुरक्षित गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची आहे.
स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी प्रत्येकाने आर्थिक नियोजन करणे आवश्यक झाले आहे. यासाठी सरकारने नागरिकांसाठी अनेक उपयुक्त योजना सुरू केल्या आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकरी, महिला, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, कोणती योजना आपल्यासाठी योग्य आहे, हे शोधणे अनेकदा कठीण जाते.
ही अडचण दूर करण्यासाठी भारत सरकारने एक खास डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेल्या सरकारी योजनांची माहिती अवघ्या एका क्लिकवर मिळते.
myScheme हे भारत सरकारचे अधिकृत डिजिटल पोर्टल आहे. येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती दिली जाते. नागरिकांना योग्य योजना शोधणे अधिक सोपे व्हावे, हाच या पोर्टलचा उद्देश आहे.
या पोर्टलवर तुम्ही तुमचे वय, उत्पन्न, लिंग, राज्य अशी मूलभूत माहिती भरली की. त्यानुसार तुम्ही कोणत्या सरकारी योजनेसाठी पात्र आहात, हे स्क्रीनवर लगेच दिसते.
myScheme पोर्टलवर शिष्यवृत्ती, किसान योजना, महिला व बालकल्याण योजना, पेन्शन योजना, रोजगार योजना यासह अनेक सरकारी योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
सर्वप्रथम myScheme पोर्टलवर भेट द्या.
त्यानंतर “Find Schemes for You” या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमची आवश्यक माहिती भरा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.