Roshan More
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा महापौर झाला आहे. तर, विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल सहा वेळा नगरसेवक म्हणून ते विजयी झाले आहेत.
भाऊसाहेब भोईर यांनी गेल्या वर्षी अपक्ष म्हणून चिंचवड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.
२०१० पिंपरी चिंचवड महापालिकेवर विरोधी पक्षनेते पदी भाऊसाहेब भोईर यांची निवड झाली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.
त्यांचे बी-कॉम पर्यंत शिक्षण झाले आहे. ते एनएसआयूमध्ये देखील सक्रीय होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे ते अध्यक्ष आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.