Nitish Kumar : नितीश कुमारांनी आतापर्यंत कितीवेळा राजीनामा दिलाय? कितीवेळा टर्म पूर्ण केली? वाचा सविस्तर

Aslam Shanedivan

नितीश कुमार

बिहारमध्ये नुकताच निवडणूक पार पडली असून त्यांनी आता 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पण याआधी त्यांनी आठ वेळा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Nitish Kumar | Sarkarnama

पहिल्यांदा मुख्यमंत्री

ते 2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. पण बहुमत न मिळाल्याने अवघ्या 7 दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Nitish Kumar | Sarkarnama

नियमानुसार राजीनामा

दुसऱ्यांदा, 2010 मध्ये जेव्हा एनडीएने प्रचंड विजय मिळवला, त्यावेळी त्यांनी विधानसभा विसर्जित करण्याच्या घटनात्मक नियमानुसार राजीनामा दिला.

Nitish Kumar | Sarkarnama

मांझी बनले मुख्यमंत्री

17 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीत जेडीयूच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Nitish Kumar | Sarkarnama

चौथ्यांदा राजीनामा

यानंतर, 2015 च्या निवडणुकीनंतर, महाआघाडीला जनादेश मिळाल्यावर आणि नितीश पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा नितीश कुमार यांनी चौथ्यांदा राजीनामा दिला.

Nitish Kumar | Sarkarnama

महाआघाडी फुटली

पण, 2017 मध्ये महाआघाडीशी फारकत घेत त्यांनी 26 जुलै 2017 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत ते एनडीएसोबत गेले आणि पुन्हा मुख्यमंत्री बनवले.

Nitish Kumar | Sarkarnama

सहाव्यांदा राजीनामा

तसेच त्यांनी एनडीएशी काडीमोड घेत 9 ऑगस्ट 2022 ला सहाव्यांदा आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाआघाडीसोबत सरकार स्थापन केले.

Nitish Kumar | Sarkarnama

7 व्यांदा राजीनामा

त्यानंतर 28 जानेवारी 2024 ला पुन्हा एकदा महाआघाडीपासून वेगळे होत एनडीएसोबत सरकार स्थापन करत 7 व्यांदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Nitish Kumar | Sarkarnama

8 व्यांदा राजीनामा

आणि आता 2025 मध्ये राज्यात पुन्हा त्यांचे सरकार आले असून घटनात्मक नियमानुसार त्यांनी 8 व्यांदा राजीनामा दिला.

Nitish Kumar | Sarkarnama

राजकन्येची गुजरातमधून थेट कोकणच्या राजकारणात उडी : धड मराठीही बोलता न येणाऱ्या भाजपच्या उमेदवार श्रद्धा भोसले कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा