Roshan More
जगभरात शांतता प्रस्थापित करणे, मानवाधिकारांचे रक्षण करणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी मजबुतीने करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी नॉर्वेजियन नोबेल समितीने हा सन्मान दिला आहे
पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या ८५ वर्षीय न्यायाधीश आहेत. त्या मूळ भारतीय वंशाच्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असलेल्या पिल्ले यांनी १९६७ मध्ये आपल्या होमटाऊन नेटालमध्ये वकिली सुरू केली आणि त्या तिथल्या पहिल्या महिला वकील ठरल्या.
त्यांनी वर्णद्वेषविरोधी कार्यकर्त्यांसाठी बचाव पक्षाच्या वकील म्हणून काम केले. त्यांनी क्वाझुलू-नाताल विद्यापीठात व्याख्याता म्हणूनही काम केले.
१९९५ मध्ये वर्णद्वेष संपल्यानंतर पिल्ले यांची दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात कार्यवाहक न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
संयुक्त राष्ट्र महासभेकडून रवांडासाठीच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणात न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली. १ सप्टेंबर २००८ रोजी त्यांची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
शांतता नोबेल विजेत्याची घोषणा करताना नोबेल प्राईज कमिटीने म्हटले की, "नवी पिल्ले यांची उज्ज्वल कारकीर्द आपल्याला जागतिक पातळीवर कायद्याच्या राज्याचे समर्थन करण्याची, ते मजबूत करण्याची आणि त्याचा विस्तार करण्याची गरज आठवून देते."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.