Roshan More
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला अपघाती निधन झाले.
अजितदादांच्या निधनाने पवार कुटुंबीवर दु:खाचा डोंगर कोसळला. अजितदादांचे समर्थक, कार्यकर्त्ये यांनी देखील शोक व्यक्त केला.
अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी बारामतीमध्ये स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहेत.
पार्थ पवारांनी सांगितले की, अनेक कार्यकर्ते व समर्थकांकडून अलीकडे दादांचा फोटो मागण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विनंत्या आल्या.
त्यांच्या भावनेचा आदर राखत आम्ही अधिकृत फोटो तयार करून सादर करीत आहोत. असे सांगत पार्थ पवारांनी अजितदादांचा फोटो फेसबूकवर शेअर केला आहे.
आपण हा फोटो आपल्या कार्यालयात किंवा घरी दादांच्या प्रेरणादायी स्मृती म्हणून लावू शकता, असे आवाहन देखील पार्थ पवार यांनी केले आहे.
पार्थ पवारांचा आज (21 मार्च) वाढदिवस असतो. त्याच दिवशी त्यांनी कार्यकर्त्यांनी कार्यालयात अथवा घरी लावण्यासाठी अजितदादांचा अधिकृत फोटो शेअर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.