सरवणकरांच्या घरात नव्या पाहुण्याचे राजेशाही आगमन; थाटात पार पडलेल्या शाही बारशाचे Exclusive Photos!

Rashmi Mane

नामकरण सोहळा

सरवणकर कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनानंतर आनंदाचे वातावरण आहे. शिवसेना नेते समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या मुलाचा नामकरण सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.

काही खास फोटो

9 सप्टेंबर रोजी झालेल्या या बारशाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले असून ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

बाळाचे नाव

समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांनी आपल्या मुलाचे नाव ‘समराज’ असे ठेवले आहे. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

फोटोशूट

या सोहळ्यात तेजस्विनी आणि समाधान यांचा खास अंदाज पाहायला मिळाला. दोघांनी आपल्या लाडक्या मुलासोबत फोटोशूटही केले.

समराजच्या बारशाचे फोटो

चिमुकल्या समराजच्या बारशाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनीही या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

उत्सुकता

तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांच्या चाहत्यांना त्यांच्या मुलाचे नाव काय असेल, याची उत्सुकता होती.

नावाची घोषणा

अखेर बारशाच्या निमित्ताने ही उत्सुकता संपली असून ‘समराज’ या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हे नाव चाहत्यांना आणि नेटकऱ्यांनाही पसंत पडताना दिसत आहे.

सरवणकर कुटुंब

22 ऑगस्ट रोजी तेजस्विनीने गोंडस मुलाला जन्म दिला होता. मुलाच्या जन्माची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. आता नामकरण सोहळ्यानंतर पुन्हा एकदा सरवणकर कुटुंब चर्चेत आले आहे.

Next : रॉयल लूक अन् जबरदस्त कॉन्फिडन्स! महाडिकांच्या थोरल्या सुनेच्या ‘स्टायलिश लूक’ची इंटरनेटवर तुफान चर्चा!!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा