Sangram Thopte joins BJP : संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश अन् नव्या राजकीय इनिंगचीही सुरुवात!

Mayur Ratnaparkhe

भाजपमध्ये प्रवेश -

काँग्रेसचे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नवी राजकीय इनिंग -

मागील कित्येक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या संग्राम थोपटेंनी भाजपचं उपरणं खांद्यावर घेत नवीन राजकीय इनिंग सुरू केली.

बावनकुळेंची प्रमुख उपस्थिती -

भाजपचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा झाला.

रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत -

याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

भाजप प्रवेशामागचं कारण काय? -

भाजपमध्ये का जात आहेत, याबाबत संग्राम थोपटेंनी पत्रकारपरिषदेत आधीच माहिती दिली होती.

काँग्रेसवर आरोप -

शिवाय आपल्यावर काँग्रेस सोडण्याची वेळ पक्षानेच आणली असल्याचाही संग्राम थोपटे यांनी आरोप केला होता.

नेमकं काय कारण? -

शिवाय काँग्रेस पक्ष राजकीय ताकद देत नसल्यामुळे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळेल असं वाटतं होतं, असंही थोपटे म्हणाले.

मंत्री, आमदारांची उपस्थिती -

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश टिळेकर, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

मोठ्या संख्येने समर्थक हजर -

या पक्ष प्रवेशासाठी मोठ्यासंख्येने संग्राम थोपटे यांचे समर्थक आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.

Next : दिल्लीचे नवीन महापौर होणारे सरदार राजा दिलीप सिंग आहेत तरी कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raja Iqbal Singh | sarkarnama
येथे पाहा