Deepak Kulkarni
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा (UPSC) 2025 चा निकाल शुक्रवारी (6 मार्च) जाहीर केला.
यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. या परीक्षेसाठी वर्षांनुवर्षे सातत्य,चिकाटी,समर्पण यांसह प्रचंड अभ्यास लागतो.
छत्तीसगडमधील महासमुंद येथील संजय दहरिया यांनी यूपीएससी परीक्षेत 946 वा क्रमांक मिळवला. संजयची कहाणी लहानसहान समस्यांमुळे नैराश्यात जाणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
बेल्टुकुरी येथील एका शेतकऱ्याच्या या 38 वर्षीय मुलान upsc परीक्षा क्रॅक होत मिळवलेलं यश हे कुटुंबासाठी आणि गावासाठी प्रचंड अभिमान आणि आनंद आणला आहे.
संजय दहरियाने 2009 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालमधील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम केलं. यानंतर त्याने नोकरी सोडली. 2012 मध्ये त्यांना लाळ ग्रंथीचा कर्करोग झाल्याचं समोर आलं. यामुळे सुमारे 7 वर्षे उपचार घ्यावे लागले.
2012 ते 2018 दरम्यान संजयने चारवेळा कर्करोगाशी झुंज दिली. 2018 मध्ये संजय कर्करोगातून बरा झाला. त्यानंतर त्याने आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि 2022 मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
रायपूरच्या चौबे कॉलनीत 100 चौरस फुटांचे घर भाड्याने घेतले. नालंदा कॅम्पसमधील ग्रंथालयात बसून त्याने यूपीएससीची तयारी केली. अखेर 4 वर्षांच्या कठीण परिश्रम आणि संघर्षानंतर संजय डहरिया यूपीएससीमध्ये यशस्वी झाला.
छोट्याशा खेड्यातून पुढे येत संजयनं आयएएस अधिकारी बनण्याची संघर्षगाथा अद्भूत धैर्य, कर्करोगाशी लढण्याची आणि शेवटच्या श्वासापर्यंत ध्येयापाठीमागं धावण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
संजय डहरिया म्हणतात की, संजयच्या बालपणी त्याच्या घरात आर्थिक चणचणीमुळे पुरेसे अन्न नसायचं. अशावेळी त्याची आई स्वत: उपाशी राहून चारही मुलांना खायला घालायची, पण ती स्वतः उपाशी राहायची. संजयला आयएएस अधिकारी बनून समाजासाठी काहीतरी करण्याचा दृढनिश्चय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.