

Mumbai News : राज्यसभेच्या देशातील 37 व महाराष्ट्रातील 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मैदानात उतरवलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन मविआत मोठ्या घडामोडी घडल्या.तसेच तीनही पक्षांनी या जागेवर दावा ठोकल्यानं नाराजीनाट्य दिसून आलं होतं. माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे हे राज्यसभेच्या जागेसाठी प्रचंड आग्रही होते. पण शरद पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतरही आदित्य ठाकरे काहीसे अलिप्तच होते. आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवर रोखठोक भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मविआमधील सर्वात मोठा पक्ष असतानाही तिसऱ्या पक्षाला संधी मिळाली, फक्त वाद नको होता, म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाला संमती दिल्याचं त्यांनी सांगितलं. याचदरम्यान, त्यांनी शिवसेना पक्ष जो दावा करत होता तो योग्यच होता, यापुढे 2029 पर्यंत पुन्हा आम्हांला संधी मिळणार नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीत सर्वाधिक 20 जागा असतानाही राज्यसभेच्या जागेवरचा दावा सोडावा लागल्यानंतर आदित्य ठाकरेंशी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आताची संधी गेल्यानंतर कदाचित 2029 पर्यंत पुन्हा संधी मिळणार नाही. कारण मविआमध्ये आम्ही काही नियम पाळत होतो. त्यानुसार सर्वात मोठ्या पक्षाला पहिला संधी मिळायची. आता सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष आमचा, पण आता संधी तिसऱ्या नंबरच्या पक्षाला संधी मिळाल्याची खंत ठाकरेंनी बोलून दाखवली.
राज्यसभेचा जो काही निर्णय झाला, तो इंडिया आघाडी म्हणून झाला. आधी काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने दावा केला होता, आम्हीही दावा केला होता. मातोश्रीवर यासंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झालं, मग आम्हीही त्याला संमती दिली. कारण आम्हाला यामध्ये कुठेही वाद नको होता,या शरद पवारांच्या उमेदवारीबाबत पडद्या मागच्या घडामोडींचा उल्लेख करताना आदित्य ठाकरेंनी केला.
दरम्यान, आताची संधी गेली, यानंतर 2028 साली काँग्रेस दावा करू शकेल. आमच्यातीलही काही इच्छुक असतील तर ते दावा करतील, असंही मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच या सगळ्या गोंधळामध्ये मतांचा कोटा हा जास्त वाढत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मी जे काही सांगत होतो ते निस्वार्थीपणे सांगत होतो. ती भूमिका माझ्या पक्षासाठी होतं.
आदित्य ठाकरेंनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेला गैरहजेरीवरही मोठा खुलासा केला. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्यादिवशी पत्रकार परिषद घेतली. त्यादिवशी मी उदयपूरला होतो आणि काल अर्जुनचं लग्न होतं. त्यामुळे मी येऊ शकलो नाही, पण आपण नाराज नव्हतो, हेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या दोन्ही जागांवर दावा प्रबळ केला होता. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत बजावलेली कामगिरी पाहता, या दोन्ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहाव्यात, असे स्पष्ट मत पक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले होते.
आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत संसदेत प्रभावीपणे आवाज उठवणाऱ्या खासदारांची देशाला आणि राज्याला गरज असल्याचं म्हटलं होतं. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी गेल्या काही वर्षांत प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. अनेक महत्त्वाच्या आणि देशहिताच्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.