Sachin Fulpagare
दरवर्षी संसदरत्न पुरस्कार प्रदान केला जातो. संसद महारत्न पुरस्कार हा दर पाच वर्षांतून एकदा दिला जातो.
पुरस्काराच्या 5 मानकरींपैकी महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हे यांची संबंधित समितीने निवड जाहीर केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात 17 तारखेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांची निवड संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आधारित करण्यात येते.
संसद महारत्न पुरस्कार 4 जणांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबारच्या खासदार हीना विजयकुमार गावित यांना हा पुरस्कार मिळणार आहे.
16 व्या लोकसभा संसद महारत्न पुरस्कार विजेत्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना खासदर श्रीरंग अप्पा बारणे यांचा यंदा पुन्हा सन्मान होणार आहे.
सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांचा यंदा संसद उत्कृष्ट मानरत्न या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. त्यामुळे हे पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.