Deepak Kulkarni
उदयनराजे भोसले यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1966 झाला असून ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13 वे वंशज आहे. ते सध्या साताऱ्याचे भाजप खासदार असून, त्यांच्या बिनधास्त, स्पष्टवक्ते आणि राजेशाही शैलीसाठी ते ओळखले जातात.
नेहमी एक कडक स्वभावाची झलक पाहायला मिळत असलेल्या भाजप खासदार उदयनराजे बुधवारी(ता.4 ) काहीसे भावूक झाल्याचं दिसून आलं. यामुळे एकदम वातावरणच बदललं.
उदयनराजे हे त्यांच्या पिताश्री श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोडोलीच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज आयुर्वेदिक उद्यानातील त्यांच्या शिल्पासमोर नतमस्तक झाल्याचं दिसून आलं.
सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथेही त्यांनी वडिलांच्या फोटोसमोर नतमस्तक होत विनम्र अभिवादन केले तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उदयनराजेंनी वडिलांचे संस्कार, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेली निष्ठा हेच प्रेरणास्थान असल्याचं म्हटलं आहे.
वडील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांच्या संस्कारांवर आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर चालण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याची भावनाही उदयनराजेंनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये नमूद केलं.
साताऱ्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून वडील प्रतापसिंह भोसले यांची शहराच्या विकासासाठीचं योगदान, दूरदृष्टी, लोकाभिमुख विचार आणि सर्वांगीण प्रगतीसाठीची तळमळ प्रेरणादायी असल्याच्या भावना उदयनराजे यांनी व्यक्त केल्या.
प्रतापसिंहराजे भोसले यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी फुलं वाहिली. त्यानंतर शांतपणे उभं राहून वडिलांच्या आठवणी दाटून आल्यानंतर उदयनराजेंना अश्रू अनावर झाले.
उदयनराजेंना अश्रू अनावर झाल्यानंतर एकदम वातावरणच बदललं.पण त्याचवेळी राजेंनी वडिलांच्या आदर्शांवर चालत रयतेची सेवा करण्याचा संकल्प या स्मृतीदिनानिमित्त अधिक दृढ केल्याचं म्हटलं.
याप्रसंगी उदयनराजेंसोबत राजमाता कल्पनाराजे भोसले, श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले, सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, अच्युतराव जाधव यांच्यासह राजेंचे कट्टर समर्थक, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.